Ratan Tata Passed Away in Mumbai: मुक्या प्राण्यांवर रतन टाटांचं फार प्रेम होतं. त्यातही कुत्र्यांवर त्यांचा विशेष जीव होता. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सातत्याने कुत्र्यांसाठी लोकांना आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. याच वर्षाच्या सुरुवातीला रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत टाटा ट्रस्टचं ‘स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल’ देखील सुरू झालं होतं. टाटा यांच्या याच प्राणीप्रेमाची साक्ष पटवून देणारा एक प्रसंग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.