महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता. राज्य शासनाने आता या पुरस्काराचं नाव बदलून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नरिमन पॉईंट येथे उभारल्या जाणाऱ्या उद्योग भवनालाही त्यांचं नाव दिलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. गुरुवारी (१० ऑक्टोबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.