माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा स्थापना सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात पार पाडत आहे. निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसंच विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे.