Ratan Tata Pune TATA Power plant: उद्योगपती रतन टाटा यांनी ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांच्या आठवणींना वेगवेगळ्या क्षेत्रातून उजाळा देण्यात येत आहे. पिंपरीतील टाटा मोटर्स मध्ये रतन टाटा यांनी काही वर्षांपूर्वी भेट दिली होती. कामगारांच्या विनंतीनंतर त्यांनी त्यांचा वाढदिवस पिंपरीतील टाटा मोटर्स प्लांटमध्ये साजरा केला होता. यावेळी त्यांनी स्वतः कॅन्टीनमध्ये जेवण करून ताट देखील स्वतः उचलून ठेवलं होतं. या कृतीने आधीच मनावर राज्य करणारे टाटा पुन्हा एकदा कामगारांच्या मनात खोलवर रुजले. या सर्व आठवणी माजी युनियन अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.