Uddhav Thackeray यांनी आज शिवतीर्थावर भाषणाच्या दरम्यान अक्षय शिंदे या बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या भाषणात केला. तसंच आनंद दिघेंचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.ठाणे जिल्ह्यात शिंदेला गोळी घातली, शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आज आनंद दिघे असते तर शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असती. आनंद दिघेंनी सर्वात पहिली शिंदेला गोळी घातली असती. असा हा नराधम, महिलेवर अत्याचार करतो, आईवर वार करतो. असा नराधम जगायचा लायकीचा नाही, असंही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.