Baba Siddique Death: मुंबईत काल अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी
झाडल्याचा संशय असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे. रात्रीपासूनच अजित पवार गटाचे नेते तसेच बॉलिवूड कलाकार लीलावती रुग्णालयाला भेट देतायत. याच पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी यांच्या राजकीय कारकिर्दीवर तसेच बॉलिवूडसह असलेल्या नात्यावर एक नजर टाकूया.