राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी दोन हल्लेखोरांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर शिवकुमार नावाचा आरोपी फरार आहे. याप्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार हा यूपीच्या बहराइच येथील रहिवासी आहे. त्यांच्या आईने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.