मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली आहे.