मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता राज ठाकरेंनी एक्स (X) या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.