मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जसं लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी तसं आता मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना ते देखील आज आम्ही केलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.