बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लाॅरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं आहे. याच गॅंगने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनादेखील धमकी दिली आहे. असं असतानाही आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत सरकारला वाटत असेल मला काहीच होणार नाही, असं म्हणत टोला लगावला आहे.