महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई असल्याचा दावा करणारी पोस्ट टाकणारा पुण्यातील एक इसम मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी सांगितली आहे. याशिवाय यात त्याचा एक भाऊ सुद्धा साथीदार असल्याचं कळतंय. नेमके हे दोघे आहेत कोण, त्यांचा बिष्णोई गॅंगशी संबंध होता की बाबा सिद्दीकी यांच्याशी वैर याविषयी समोर आलेले तपशील जाणून घेऊया. शुभम लोणकर उर्फ ‘शुबु लोणकर’ या अकाऊंटवरून त्याने ही पोस्ट टाकली होती, तो अकोल्याचा रहिवासी आहे आणि सध्या तो फरार आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, तर त्याचा भाऊ प्रवीण, जो या कटाचा कथित भाग आहे, त्याला पुण्याहून अटक करण्यात आली आहे.