प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं आज निधन झालं आहे. आपल्या अभिनयानं अतुल यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. आज त्यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अतुल परचुरेंना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाला होता, त्यांनी कॅन्सरवर मात देखील केली होती, पण आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. त्याच्या मागे त्याची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. नाटक, सिनेमा, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुल यांना कर्करोग झाला हे ऐकून अनेकांना धक्का बसला होता.