शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा अनेकदा अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावरूनच आता शरद पवार यांनी साताऱ्यात बोलताना विरोधकांना ऐकवून दाखवलं आहे. आपलं वय ८४ होऊ द्या, ९० होऊ द्या हे म्हातारं काही थांबत नाही, असं म्हणत त्यांनी पुढील निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचं एकप्रकारे सांगून टाकलं आहे.