विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. सध्या या सदस्यांचा शपथविधी पार पडत आहे.