नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी या चिन्हांचा गोंधळ झाल्याचं पाहायल मिळालं होतं. दोन्ही चिन्हांमध्ये साम्य असल्याने पिपाणीमुळे तुतारी चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) फटका बसला होता. त्यामुळे यावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने काय खबरदारी घेतली? या प्रश्नावर बोलताना आयुक्त राजीव कुमार यांनी आयोगाची भूमिका स्पष्ट केली आहे.