महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत महाराष्ट्राला एक सक्षम आणि वेगळा पर्याय देण्यासाठी आपली नवी आघाडी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.