राज्यात घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवरून विरोधी पक्षातील नेते कायदा सुव्यवस्थेवरून गृहमंत्री फडणवीस यांच्यावर वारंवार टीकास्त्र डागतात. त्यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला फटकारलं आहे. कायदा सुव्यवस्थेवरून बोलताना त्यांनी आधी आरसा पाहावा. ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आता कायदा सुव्यवस्था शिकवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.