राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन महायुतीमधील अजित पवार गटामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ६०० पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. तसंच शहराध्यक्ष दीपक मानकर हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र या एकूणच परिस्थितीवर दीपक मानकर यांनी भूमिका मांडली आहे.