Gross Salary Meaning: महिन्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या पगारावर सामान्य नोकरदार वर्गापासून लाखोंचं ‘पॅकेज’ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं महिन्याचं गणित अवलंबून असतं. पण आपला नेमका पगार किती आणि आपल्याला प्रत्यक्षात मिळतो किती, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आपल्या पॅकेजपेक्षा प्रत्यक्षात महिन्याला असणारा आपला पगार कमी का असतो? हे वरचे पैसे कुठे जातात?सॅलरी स्लीप अर्थात पगाराच्या स्लीपमध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असतो. याच स्लीपमध्ये आपला कंपनीकडून सांगण्यात आलेला पगार व आपल्याला प्रत्यक्षात मिळणारा पगार अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख असतो. पण त्याचबरोबर इतरही अनेक बाबी नमूद करण्यात आलेल्या असतात. या बाबी म्हणजेच आपला CTC अर्थात कंपनीकडून देण्यात येणारा पगार आणि NET अर्थात प्रत्यक्षात आपल्या खात्यात जमा होणारा पगार यातला फरक असतात!