Sukanya Samriddhi Yojana : महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल भारताने उचललं. २०१५ मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. या धोरणानुसार एक खास योजनाही आणण्यात आली. या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. मुलींचा आर्थिक भार आई-वडीलांच्या किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करुन त्यांच्या शिक्षमसाठी आणि लग्नाच्या खर्चाचा विचार करुन सुकन्या समृद्धी ( Sukanya Samriddhi Yojana ) योजना आणण्यात आली आहे. योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे? हे पैसे आपल्याला कसे मिळू शकतील? सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं? सुकन्या समृद्धी योजनेच्या अटी आणि नियम काय? याविषयी तपशीलवार माहिती जाणून घेऊया.