Maid Mixed Urine In Food: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाच्या घरात आठ वर्षं जेवण बनवणाऱ्या एका मोलकरणीनं त्यांच्या जेवणात चक्क लघवी मिसळली. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यानंतर संशयामुळे या व्यावसायिकानं नेमक काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी स्वयंपाकघरात एक मोबाईल फोन लपवून ठेवला. मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड झालेल्या या व्हिडीओत ती मोलकरीण चक्क जेवणात लघवी मिसळताना दिसली. पुरावा मिळाल्यानंतर त्या व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल करून, दोषी मोलकरणीवर कारवाई करण्याची विनंती केली.रिपोर्टनुसार व्यावसायिकाचे कुटुंब अनेक दिवसांपासून यकृताच्या समस्येने (Liver Issue) त्रस्त होते. वैद्यकीय उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळेच व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने स्वयंपाकघरात एक छुपा कॅमेरा सेट केला.तक्रारीनंतर या मोलकरणीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली. या दोषी महिलेचे नाव रीना असे आहे.
GHAZIABAD: A maid working for a real estate businessman for eight years has been arrested for allegedly mixing urine in the dough used to make rotis, police said. The maid, identified as Reena (32) from Shanti Nagar Colony here, was caught on camera committing the alleged act, police said.15 hours ago