रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती एक पद यानुसार न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.