Last Sati Case In India Roop Kanwar: वृत्तपत्रातून ४ सप्टेंबर १९८७ रोजी एक बातमी झळकली, ती वाचून देशभरातील सर्व लोकांना धक्का बसला. राजस्थानातील जयपूरजवळच्या दिवराला गावात १८ वर्षांची रूप कंवर नामक तरुणी नवऱ्याच्या चितेवर सती गेली.भारतातील सती प्रथेचे शेवटचे ज्ञात प्रकरण, रूप कंवरच्या मृत्यूचं समर्थन केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना ३७ वर्षानंतर, जयपूरच्या विशेष न्यायालयाने बुधवारी ‘Benefits Of Doubt’ देत निर्दोष मुक्त केले. या आठ जणांनी रूप कंवर सती गेलेल्याच्या एका वर्षानंतर या कृत्याचं गौरव करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. सती निवारण न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अक्षी कंसल यांनी महेंद्र सिंग, श्रवण सिंग, निहाल सिंग, जितेंद्र सिंग, उदय सिंग, दशरथ सिंग, लक्ष्मण सिंग आणि भंवर सिंग यांची निर्दोष मुक्तता केली. आठही जण जामिनावर बाहेर होते.