दिव्यातील आगासन गावातील ठाणे महापालिकेच्या शाळेतील ४० मुलांना खिचडीतून विषबाधा झाली. ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. 40 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत आहे मात्र आता या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.