राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरुन आता अजित पवार गटातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी पक्ष आणि महिला बोलत नाहीत. एक व्यक्ती बोलते त्यामुळे त्याला फार गांभीर्याने घ्यावं असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.