बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज आला असून यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेले बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था सलमान खानची होईल, असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या मेसेजची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सलमान व बिश्नोई वाद