Maharashtra Vidhansabha Election:मावळ विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत कलह निर्माण झालाय. राष्ट्रवादीचे बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. मला महामंडळ नको आहे. असं म्हणत त्यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष पद नाकारलय. यावर विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिलीय. इच्छुक असणं गैर नाही. तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. काही जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. अजित पवारांच्या जवळील व्यक्तींना बाजूला करण्याचा प्रयत्न असल्याच म्हणत लवकरच त्यांची नाव व्यासपीठावरून जाहीर करणार असल्याचा इशारा शेळके यांनी दिलाय.