भाईदर मधील प्रसिध्द ‘वी अनबिटेबल’ या डान्स ग्रुपच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रुपच्या व्यवस्थापकासह ७ जणांवर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये बॉलिवूडचा प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोजा तसेच पोलीस आयुक्तालयातील एका पोलिसाचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास आता आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा-२ कडे वर्ग करण्यात आला आहे.