Ratan Tata Will: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांचे भाऊ नोएल टाटा यांची निवड करण्यात आली. आता त्यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी चार लोकांची निवड करण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. वकील दारियस खंबाटा, रतन टाटा यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री, सावत्र बहिणी शिरीन आणि डिआना जीजीभॉय यांची यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती होती आणि आता त्यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले चौघे कोण आहेत हे आपण पाहणार आहोत.