गेल्या वर्षभरापासून इस्रायलमधील हमासचे हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझा पट्टीत केलेल्या हवाई कारवाया याच्या चर्चा चालू आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे युद्ध चिंतेचा विषय ठरलं आहे. पण गुरुवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचं समोर आलं आहे. अशातच इस्रायलच्या लष्करानं शेअर केलेला याह्या सिनवारच्या शेवटच्या क्षणांचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.