कल्याण स्थानकाजवळ घसरलेली लोकल रेल्वे अखेर मध्यरात्री रेल्वे कर्मचाऱ्यांनी मार्गस्थ केली. मात्र, रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरू असून मध्य रेल्वेच्या सेवा अद्याप विस्कळीत आहेत. पहाटेपासूनच ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टिटवाळा दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवांवर याचा विशेष परिणाम झाला असून या मार्गावरील गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू आहेत.