आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फाईन आर्ट छायाचित्रकार सुजाता सेटिया यांच्या ‘अ थाऊजंड कट्स’ या छायाचित्रांचं प्रदर्शन महालक्ष्मी येथील G5A येथे १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. सेटिया यांच्या लेन्सद्वारे टिपण्यात आलेली प्रभावशाली छायाचित्रं विविध देशांमधील स्त्रिया सहन करत असलेल्या हिंसाचार आणि अत्याचारांच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकतात. प्रत्येक छायाचित्रामागे एक गोष्ट दडलेली आहे. हीच गोष्ट थाऊजंड कट्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.