सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या गदिमा पार्क समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्याची माहिती समोर आली आहे. हे समजताच पाचशे रुपयाच्या नोटा गोळा करण्यासाठी आटपाडीत शनिवारच्या बाजारासाठी आलेल्या लोकांनी एकच गर्दी केली होती. मात्र या नोटा ओढ्यामध्ये नेमक्या कशा आल्या याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.