महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी फक्त ३५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तर २६ तारखेपर्यंत सरकार बनवावं लागणार आहे. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात सरकार बनविण्यासाठी केवळ ४८ तास मिळतील. यात जर वेळ घालवलवा तर अमित शहा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.