चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपाने शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगताप कुटुंबात आनंदच वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून कलह असल्याचं बोललं जात होतं. यावर अश्विनी जगताप यांनी पडदा टाकत आमच्या दोघांमध्ये कुठलाही कलह नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षातील अजित पवार गटाचे नाना काटे हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काटे दोन दिवसात त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.