Baba Siddique Murder News Today: राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कसून तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. दसऱ्याच्या दिवशी दि. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी शूटर्सला अटक केली असून गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, झिशान सिद्दिकी हाही शूटर्सच्या रडारवर होता. पण खेरवाडी येथील कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीत लगेच बसल्यामुळे त्याच्यावर हल्ला करता आला नाही. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला केला. बाबा सिद्दिकी यांची गाडी झिशानच्या कार्यालयापासून २०० मीटर अंतरावर पार्क केली होती. तिथे कार्यकर्त्यांसह चालत जात असताना आरोपींनी गोळीबार केला. दरम्यान या एकूण प्रकरणी पोलिसांनी काय माहिती दिली आहे तसेच झीशान सिद्दीकी यांनी यावर काय म्हटलंय हे पाहूया.