CM Ladki Bahin Yojana Bank Strike Update: महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबवताना बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ लागल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज, २१ तारखेपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला असून त्यामुळे ऐन निवडणूक काळात बँकांचा संप होण्याचीही शक्यता आहे. नेमकं हे प्रकरण काय, बँक युनियनची भूमिका काय आहे? यावर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटलंय? निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने योजना बंद होण्याबाबत महाराष्ट्र सरकारची काय माहिती आहे याचे सर्व तपशील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या.