विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. अशातच आरोप प्रत्यारोपही सुर झाले आहेत. भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी मतदारसंघात एका मेळाव्यात केलेलं विधान सध्या चर्चेत आहेत. सुजय विखेंंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है”, असं म्हणत सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांना इशारा दिला आहे.