शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज सकाळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. नंतर ते मातोश्रीवर येतील आणि त्यानंतर आम्ही, उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांची त्यांच्यासोबत बैठक होईल. त्यानंतर काय करायचे ते पाहू, परंतु सध्या सर्व काही ठीक आहे.”, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.