राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. असं असतानाच सोमवारी २१ ऑक्टोबरच्या रात्री खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका गाडीतून तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाचा हल्लाबोल केला आहे.