Pune Traffic Changes: पुणे शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. नाकाबंदीसाठी शहर, उपनगरातील २७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय पुणे शहरामध्ये मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी केलेलं हे व्यवस्थापन व्यवस्थित समजून घेऊया.