Dharmaraj Kashyap : बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला मुंबईत हत्या करण्यात आली. या प्रसंगी तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या चालवल्या. तीन पैकी दोन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. यापैकी धर्मराज कश्यप हा आरोपी लॉरेन्स बिश्नोईला आदर्श मानत असल्याची बाब समोर आली आहे. धर्मराज कश्यप ( Dharmaraj Kashyap ) हा २० वर्षांचा तरुण आहे. त्याने बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या. हा धर्मराज कश्यप कोण आहे आपण जाणून घेऊ.