मनसे नेते अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंविरोधात आता शिवसेना ठाकरे गट उमेदवार देणार का? यावर चर्चा रंगली आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी पहिल्यांदाच निवडणुक लढणाऱ्या अमित ठाकरे यांचं स्वागत केलं आहे. तसंच ठाकरे गटाकडून विरोधात उमेदवार देणार का? याबाबत सूचक विधानही केलं आहे.