Crime News Marathi: क्षुल्लक कारणांवरून खासगी शिकवणी घेणार्या शिक्षिकेने १० वर्षाच्या मुलीच्या कानाखाली मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या श्वसनलिकेसह मेंदूला ईजा झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मागील ८ दिवसांपासून ती कृत्रिमश्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवर) मृत्यूशी झुंज देत आहे.