गेल्या अनेक दिवसांच्या मॅरेथाॅन बैठकांनंतर अखेर महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून खटके देखील उडाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता एकमताने हे जागावाटप झाल्याचं बोललं जात आहे.