शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. तर माहीम मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होणार हे नक्की.