खासदार संजय राऊत हे सध्या मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहे. महाविकास आघाडीमध्ये ८५ च्या फाॅर्म्युलानुसार जागावाटप झालेलं आहे. मॅरेथाॅन बैठकांनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. तर उर्वरित जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार असं खासदार संजय राऊत म्हणाले होते.