शिवसेना ठाकरे गटाने आपल्या ६५ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. काही नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या जागेसाठी पक्षातून मला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. परंतु एका मतदारसंघात अडकून राहण्यापेक्षा मी इतर उमेदवारांसाठी प्रचार करेन, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.