कवठेमहाकाळमधून शरद पवार गटातील रोहित पाटील यांच्याविरोधात अजित पवार गटाचे संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. रोहित पाटील यांनी आज आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी संजय पाटील यांच्या उमेदवारी बोलताना रोहित पाटील म्हणाले की, स्वार्थासाठी त्यांनी अनेकवेळा गट बदलला.लोकहित बाजूला ठेवून त्यांनी राजकीय कारकीर्द बजावली आहे.माझ्या वडिलांविरोधात लढताना लोकं हे जाणत होते आणि निर्णय घेत होते. त्याच पद्धतीने लोक आता निर्णय घेतील असं रोहित पाटील म्हणाले.